पुनरागमन
पुनरागमन
नीरद जकातदार एक विचारवंत लेखक.वय आणि शहाणपण बरोबरच वाढते म्हणतात ,सर्वसामान्य नियमही तसाच समाजाला जातो ,पण नियमाला सन्मानीय अपवाद हे असतातच.नीरद जकातदार हे त्या अपवादाचे एक सक्षम उदाहरण.विशी नुकतीच पार केलेल्या ह्या मुलाकडे एवढी वैचारिक समतोलता येतेच कुठून ,?केजरीवाल आणि पार्टी ह्या त्याच्या लेखात चिरंजीव नीरदने अतिशय सडेतोड पणे केजरीवाल ह्यांच्या कार्यप्रणालीच्या यशस्वीते बद्दल संशय प्रगत केले आहेत.आदर्श राज्य हे स्वप्न नव्हे तर एक सत्य ठरायला पाहिजे आणि सत्याला वास्तवाच्या अग्नीत तावून सुलाखून निघावे लागते हाच वास्तववादी संदेश नीरद ह्या लेखाद्वारे देऊ इच्छितो.
बुद्धी ,सचोटी देशभक्ती हि कोण्या एका वर्गाची अथवा व्यक्तीची मिरासदारी ठरूच शकत नाही ,भगवे वस्त्र परिधान करून संन्यासी वृत्ती येत नाही.
अहंकारी वृत्ती हि फार धोकादायक असते ..आपण संसदीय लोकशाही वर आधारित राज्यव्यवस्था अंगिकारली आहे आणि भारतीय राज्यघटना हि संसदीय राजकारणाचे मुलभूत प्रेरणा स्त्रोत आहे ,संसदीय राजकारण घटनेच्या चौकटीत राहूनच झाले पाहिजे.भारतीय राज्यघटना हे एक अमोघ शास्त्र आहे आणि कवचही आहे .कुठल्याही प्रकारचा बेशिस्तपणा अथवा सवंग लोकप्रियते साठी केलेल्या मर्कट लीला फार दिवस जनता सहन करू शकत नाही. सार्वजनिक निवडणुकातून

ह्याचा संदेश ह्या देशाच्या सुबुद्ध जनतेने वेळोवेळी दिला आहे. नीरद च्या लेखातून हेच प्रतीत होते आहे सरसर विवेक बुद्धीला ,आणि नित्यानित्य विवेकाला मनापासून धन्यवाद.नीरद तुझ्यासारख्या लेखकांची समाजाला खरोखर जरूर आहे.असेच लिहित जा..
बऱ्याच दिवसाने नीरद कडून काही सकस आणि विचारप्रवर्तक वाचायला मिळाले.गणेश विसर्जनाच्या वेळेला केलेल्या उत्तर पूजेच्या वेळेला तांदूळ घालतात आणि म्हणतात "पुनरागमानायचं "
बुद्धीदात्या गणेशाची सारासार बुद्धी दाखवणाऱ्या ह्या लेख बद्दल नीरद चे मनापासून कौतुक करावेसे वाटते ,वय आणि सारासार विवेक बुद्धीचे काही गणित असते असे हि नाही.

शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२