Thursday, July 21
परमेश्वर हा एखाद्या मनस्वी कलाकारा प्रमाणे आहे त्याची एखादी निर्मिती इतकी मनपूर्वक करतो की त्याला तोड नाही असे वाटते ,रुप रंग आवाज आणि बुद्धी ह्या सर्व सद्गुणांची पखरण करून अजोड कलाकृती हा मानसीचा चित्रकार निर्मितो अशीच एक परमेश्वरीय कलाकृती काल दिनांक २४.०४.रोजी बघायला मिळाली ह्या ईश्वर निर्मित कलाकृतीचे नाव आहे "श्रीरंग राजेंद्र भावे ".पार्ल्यातील" पंचमी " ह्या संस्थेने पेश केलेल्या भावगीतांच्या कार्येक्रमात आपल्या अजोड गायकीची चुणूक ह्या कलाकारांनी दाखवली ,गळ्यात गांधार बाळगून आपल्या भावपूर्ण गीत गायनाने समोर बसलेल्या श्रोत्यांना १५ ते २० वर्ष पूर्वीचा भावगीतांचा कालखंड उलगडून दाखवला त्याचे गायनाच नव्हे तर अस्तित्वही परमेश्वरीय भासत होते ,मराठी युवक असावा तर कसा ह्याचे एक सर्व गुण शुद्ध उदाहरण..उच्च विद्या आणि कला भूषित अश्या ह्या कलाकाराच्या कलाविष्काराला पाहून एक काव्य पंक्ती आठवली " अनंत हस्ते कमला कराने देता किती घेशील दो कराने." परमेशाने अनंत हस्ताने केलेली पखरण ज्या कर द्वायाने सांभाळली ते करद्वय हि कसे असतील तेव्हा नकळत लक्ष गेले हातांकडे खरोखरच सुबक आणि सुघड कलाकारी हात परमेश्वराची बिनचूक कलाकृती. जग जिंकायला निघालेल्या ह्या "परी कथेतल्या राजकुमाराच्या "चेहऱ्यावर हे विनम्र पण
आत्म विश्वासीत "जितं मया"भाव आले कुठून ?उत्तर आले "हे तर नक्षत्रांचे देणे"
आत्म विश्वासीत "जितं मया"भाव आले कुठून ?उत्तर आले "हे तर नक्षत्रांचे देणे"
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२