मैत्रायण ( मित्रांचे रामायण )
Translate
शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५
अमेय घरत
शब्दांच्या पलीकडेही एक जग असतं… खूप काही! त्या दिसत नसलेल्या भाव-भावनांना एकत्र आणून शब्दांच्या माळेत गुंफणं, ती माळ बहुभाषिक करून जाहिरातीच्या जगात परिणामकारकरित्या वापरणं—हे फक्त त्यालाच जमतं, जो शब्दांवरही प्रेम करतो आणि माणसांवरही तितकंच प्रेम करतो.
परमेश्वर हा खूपच लहरी चित्रकार असावा. कधी तो अमेयसारखी सुंदर चित्रं मन लावून रेखाटतो, तर बहुतेक वेळा माझ्यासारखी व्यंगचित्रे काढण्यात त्याचा हात सफाईदार असतो.
सूर्य आणि चंद्र कधीच एकत्र येत नाहीत म्हणतात—एक उगवतो तेव्हा दुसरा मावळतो.
पण अमेयच्या बाबतीत मात्र या नियमालाही परमेश्वराने अपवाद बनवला.
कारण त्याच्या डोळ्यांत चंद्रासारखं नितळ चांदणं आहे, आणि चेहऱ्यावर सूर्याएवढी तेजस्वी बुद्धिमत्ता.
जाहिरातीचा धंदा तेजीत असल्यामुळे कदाचित देवाने स्वतःच या क्षेत्रात उतरायचे ठरवले आणि ‘आपला मास्टरपीस’ म्हणून अमेयला पृथ्वीवर पाठवले असावे.
पण अमेय म्हणजे फक्त जाहिरात नव्हे—तो म्हणजे सत्याचा, संवेदनशीलतेचा आणि भाषेवरच्या प्रेमाचा शंभर टक्के संगम.
भाषेवरचे त्याचे प्रेम हे अक्षरशः एक व्रत आहे.
त्या व्रतासाठी त्याने साहित्याच्या कित्येक वाटा पायाखाली तुडवल्या आहेत.
कविता, एकांकिका, जिंगल्स, कथा, लेख—असा कितीतरी प्रकारांवर त्याची ‘अमेय’ मुद्रा ठळकपणे उमटलेली दिसते.
कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक येथे झालेल्या “नातवांच्या कविता” या कार्यक्रमात, सहा नातवांपैकी एक प्रतिनिधी म्हणून त्याने स्वतःच्या कविता रंगतदारपणे सादर केल्या—हा त्याच्या काव्यस्वभावाचा मोहक आविष्कार.
अभिनय हे त्याचे दुसरे निष्ठेचे वेड.
देवेंद्र पेम सारख्या थोर रंगकर्मींकडे त्याने अभिनयाचे धडे घेतले आहेत.
उद्या मराठी रंगभूमीवर किंवा टीव्हीवर एक नितळ डोळ्यांचा, देखणं व्यक्तिमत्त्व असलेला अभिनेता दिसला तर नक्की समजावं—तो अमेयच असेल.
फोटोग्राफी हा त्याचा आवडता छंद. जाहिरातीच्या चंदेरी दुनियेत राहूनही हा तरुण जमिनीवर पाय टेकवून जगतो—“माणूस” हा त्याचा अतिशय आवडता विषय.
विठ्ठलाच्या “लेकुरवाळा” भावात तो माणसांच्या संगतीत त्यांचं आगळेपण शोधतो—कौतुकानं, प्रेमानं.
आत्मा म्हणजे परमात्म्याचा अंश हे त्याला इतक्या तरुण वयात उमजलं आहे.
आणि म्हणूनच अध्यात्मिक अनुभूती त्याच्यापर्यंत सतत पोहोचत राहते.
खरंच, अध्यात्माला वयाची अट नसते—त्वरित जाणणारा, अनुभवणारा असा हा अमेय
सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५
अमेय घरत... ग्रे आकाशातील शुक्रतारा

शब्दांच्या पलीकडले काय असत?... बरेच काही! त्या सर्व भाव-भावनांना एकत्र आणून शब्दात आणि तेही बहुभाषिक शब्दात गुंफणे आणि जाहिरातीसाठी त्याचा परिणामकारक उपयोग करणे हे फक्त त्यालाच जमते जो मनापासून शब्दांवर आणि माणसांवरही प्रेम करतो.
परमेश्वर हा लहरी चित्रकार असावा म्हणून कधी कधी तो अमेय सारखी चित्र मन लाऊन काढतो अन्यथा माझ्यासारख व्यंगचित्रे काढणे हा त्याचा आवडता छंद. सूर्य आणि चंद्र कधी एकत्र येत नाही म्हणतात. एक उगवतो तेव्हा दुसरा मावळतो. पण अमेयाच्या बाबतीत परमेश्वराने हे हि डावलायचे ठरवलेले दिसत. आड म्हणून तर त्याच्या डोळ्यात दिसते चांदणे आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचा सूर्य. जाहिरातचा धंदा तेजीत असल्याने कदाचित परमेश्वराने त्यात उतरायचे ठरवून आपले मास्टर पिसेस पृथ्वीवर पाठवाचे म्हणून अमेयला पाठवले असावे. पण अमेय म्हणजे नुसतीच जाहिरात नव्हे तर शत प्रतिशत सत्यही. भाषेवरचे त्याचे प्रेम हे एक व्रत आहे. त्यासाठी साहित्याच्या कित्येक प्रांतात त्यांनी शिलेदारी केली आहे. कविता, एकांकिका, जिंगल्स, कथा, लेख अशा अनेक प्रकारांवर आपली अमेय मुद्रा त्यांनी उमटवली आहे.
कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक येथिल कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या "नातवांच्या कविता" या कार्यक्रमात सहा नातवांपैकी एक नातू म्हणून त्याने स्वतःच्या कविता सादर केल्या. अभिनय हे ह्याचे दुसरे वेड. देवेंद्र पेम सारख्या सुप्रसिद्ध रंगाकार्मिंकडे ह्यांनी अभिनयाचे धडे घेतले आहेत. भविष्यात एक स्वनिल डोळ्यांचा आणि खुबसुरत चेहऱ्याचा अभिनेता मराठी रंगभूमीवर अथवा टीव्हीवर दिसेल. फोटोग्राफी हा ही त्याचा आवडता छंद. जाहिरातीच्या चंदेरी दुनयेत राहूनही हा युवक जमिनीवर पाय घट्ट रोऊन उभा आहे. 'माणूस' हा ह्याचा आवडता विषय. "विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा." माणसांच्या संगतीत राहून त्यांचे आगळेवेगळेपण हा शोधतो आहे.
आत्मा हे परमात्म्याचे रूप आहे हे ह्याला तरुण वयातही कळले आणि त्याची अनभूती अध्यात्म्याच्या वाटेवर ह्याला येत असते. अध्यात्मिक अनुभूतीला वयाचे बंधन नसते हेच खरे!
अमेय, तुझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर "चालण्याची दिशा बदलताच डावे उजवे आपोआप बदलते आणि डोईवर केवळ 'ग्रे' आकाश उरते!"
खर आहे, पण माझ्यासाठी त्या आकाशात एक तेजस्वी शुक्रताराही लुकलुकतो आहे... अमेय!
- शशांक रांगणेकर
------------------------------------------------------------------------------------------
8 comments:
- Ashish Galandesaid...
- mi pan ameya chya kalagunana cha Ek fan.....
khar tar Amey Baddal bolayache tar shabd kami padatil....
pan Amey nehami Shukra tarya Sarakha Chamakat raha....
Ashish G. - February 14, 2012 at 12:24 AM

- Pratik Mhatresaid...
- Simply Gr8 Shashank Sir.. :) achuk Shabdat Amey la herlat tumhi.. :)
ha shukratara asach sadaiva luklukat raho hyach sadichha..!!! :) :) :) - February 14, 2012 at 2:22 AM

- surajsaid...
- Ameya is a multi-talented Artist.
Shashank sir, Atishay Sundar shabdat ameya aamchya samor aanlat, for this reason Thnk u very much.
Nice obsevation & Writing. - February 14, 2012 at 4:55 AM

- Ravssaid...
- He is very talented in field of art and creativity...he has certainly created niche for himself.
- February 14, 2012 at 9:09 AM

- Yogesh More said...
- Hey Mr. Shankar,
Thanks for writing on our friend....
He is a creative thinker & multi-talented Artist. we r proud to be your friend Ameya.
Yogesh. - February 15, 2012 at 2:36 AM

- Ganesh Sawantsaid...
- नमस्कार, अमेय एक पुस्तक आहे ज्यात प्रत्येक पानावर एक वेगळा विषय, वेगळा पैलू, वेगळे विचार ....... आणि अशी अगणित पाने. माणसात राहून माणसां माणसांमधील नातीगोती, प्रेम, जिव्हाळा आणि लाघविपणा यांचा पूर्ण समन्वय साधताना आध्यात्माशी तादात्म्य पावून तो आपल्सावत सहज वावरतो. सगळ्यांच्या सुखदु:खात समरस होऊन तो कधी कमात मग्न होईल ते कोणालाच कळणार नाही. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. गणेश सावंत
- February 15, 2012 at 11:55 PM

- Prateik Zsaid...
- "Amey" manjech "Boundless" Nava pramanech hey gun tyat disun yetatach.... :)
अमेय घरत... ग्रे आकाशातील शुक्रतारा!...This is really awesome.. :)
Simply great Shashank Ranganekar! :)
Prateik. - February 17, 2012 at 5:28 AM

- SHASHANK RANGANEKARsaid...
- प्रिय जनहो
तुमचे अभिप्राय मिळाले आणि आवडलेही ,माझ्या समोरच्या आकाशात बरेच तारे ,तारका लुकलुकतात आहेत ,त्यांना तुमच्या समोर आणण्यासाठी मी "मैत्रायण"नावाच्या ब्लोगवर काम करीत आहे अर्थात तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि वाचनीय पाठींबा जमेस धरून ,
"घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे"
शशांक रांगणेकर - February 23, 2012 at 12:37 AM

रविवार, १९ जानेवारी, २०२५
राधा कृष्णावरी भाळली
राधा आणि अमोल मला भेटलेले एक निरागस मेहूण,मेहूण हा शब्द वापरण्या इतके स्वच्छ आणि प्रसन्न आणि प्रफुल्ल.
मेहूण हा शब्द इतका भावांकित आहे कि त्याचा समानार्थी शब्द पती पत्नी ,अथवा नवरा बायको असा होऊ शकत नाही पूजेच्या दिवशी शंकर आणि पार्वतीचे अथवा लक्ष्मी नारायण स्वरूप समजून सन्मानित करून भोजनाला बोलावल्या गेलेल्या निमंत्रित जोडप्याला मेहूण म्हणतात ,त्या शब्दाची गरिमा आगळी वेगळीच आहे .
अमोल आणि राधा साधारण दोन ते तीन वर्षापूर्वी मला भेटले होते,काही कामानिमित्त्य अमोल राधा बरोबर माझ्या कडे आला होता दोघेही साधारण ४ ते पाच तास माझ्या बरोबर होते ,चिरंजीव राहुल देशपांडे च्या ओळखीने ते मला भेटले. अमोल आणि राधा प्रसन्नतेचा एक ठसा माझ्यावर उमटवून गेले ,उच्च पदस्त अमोल म्हणजे एक संस्कारित बियाणे ,ज्याच्या रोमारोमात संस्कार निथळत असतात ,राधाही तशीच ,made for इच other म्हणावे असे,सुशिक्षित संस्कार क्षम सह जीवनाचे एक चालते बोलते रूपक.
प्रेम आपुलकी आदर जिव्हाळा मराठी तल्या ह्या सर्व संस्कारक्षम शब्दांचे प्रगटीकरण करणारे ह्यांचे वर्तन मी अजूनही विसरू शकत नाही.
श्रावण महिन्यात सणावारी मेहूण बरयाच घरात पूजतात त्या आठवणीना उजाळा देणारे हे मेहूण माझ्या कायम आठवणी च्या मखरात बसलेले आहे.
शशांक रांगणेकर
