मयुर घोडे ,
जे न देखे रवि ते देखे कवी अशी एक म्हण आहे ,कवी मन इतके संवेदनशील असते कि कित्येक
हृदय स्पंदने त्याच्या हृदयात उमटत असतात ,"ये हृदयीचे ते हृदयी "हि जी अवस्था आहे ती आल्या शिवाय काव्याची निर्मिती होत नाही .
मयुर घोडे हा खऱ्या अर्थाने कवी आहे त्याची नियती हि एक कविता नुकतीच माझ्या वाचनात आलि.
मयुरच्या ह्या कवितेत त्याच्या ग्यालरीत बांधलेल्या एका चिमणीच्या घरट्याची चित्र कथि रंगवली आहे . सृजनाच्या कविता रंगवताना वेदनेचे रंग भरावेच लागतात ,आपण घातलेल्या अंड्यांची निगा करताना एका चिमणीचे मन किती घाबरलेले हि तिची भयभीत अवस्था मयुरने तंतोतंत उभी केली आहे ,ह्या चिमणीच्या माध्यमातून एका आईची कथा आणि व्यथा मयुरने शब्दांचे फापट पसारे न पसरवता नेमक्या शब्दात एक उभी केली आहे . भावना कळल्या कि शब्द आपोआप मागोवा घेत येतात ,संवेदनशील कविमन शब्दांचा शोध घेत ब. सत नाही मयुर भावनांचे चित्र रंगवतो आणि शब्दांचे रंग आपोआप भरले जातात ,
निसर्ग ,जन्म मृत्यू ,संवेदना ,पोषण ,आणि ह्या सर्व भावनांवर मात करणारी एक अविनाशी जबरदस्त सद्भावना ह्यांच्या पायावर उभारलेली हि कविता सृजनाचे मंगल स्तोत्रच आहे.
मयुर असेच लिहित जा तुझा आणि मराठी कवितेचा भविष्य काळ उज्ज्वल आहे
शशांक रांगणेकर

12.11.14