Translate

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

सारंग भणगे

सारंग भणगे
. सारंग भणगे
अखेर लिहाचे कशा साठी तर ह्या हृदयीचे त्या हृदयी जाण्यासाठी ,लेखकाचे कवीचे विचार जेव्हा शब्दांच्या माध्यमातून वाचकाकडे पोहचतात रुजतात आणि नव निर्मिती होते. त्यासाठी त्या शब्दात रुजण्याची एक क्षमता असावी लागते ,अथवा बुद्बुद्यान्सारखे उमटणारे शब्द कवी आणि कवितेला घेऊन बुडतात आणि त्यांचा मागमूसही राहत नाही  सारंग भणगे एक तरुण कवी ,लेखक ,विचारवंत असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. ज्याच्या लेखनात केवळ शब्दांची आतिषबाजी नसून भावनांची पखरण जागोजाग आढळते ,
अखेर शब्द म्हणजे काय केवळ स्वर आणि व्यंजनांचे वंध्या मैथुन नव्हे तर भावोनोत्सावांचे एक संस्करण आणि निर्मितीचा कुमारसंभव, सागरचे लेखन हा निर्मितीचा एक सोहळाच आसतो ,त्याच्या मनातल्या भावनांना वाचकाच्या मनात उतरवून त्यात संवेदनाची प्राण प्रतिष्ठा करणारी त्याची कविता हि आगळी वेगळीच .

त्याच्या दोन कविता वाचण्याचे सौभाग्य नुकतेच मला प्राप्त झाले ,"पांडुरंग रावो" आणि नमन
पंढरपूरचा कटेवरी कर ठेऊन उभा ठाकलेला कानडा विठ्ठलू हे मराठी मनाचे प्राण ज्याला विठोबा माहित नाही तो मराठी नाही ,
संत वांग्मय हि तर मराठी साहित्याची सद्सद्विवेक बुद्धीच संतानी मराठी साहित्याला दिशा दिली ,चांगले आणि वाईट ह्यातला फरक सांगितला आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग मानवी सेवेतून जातो हे दाखवले नाम संकीर्तनातून ईश्वर प्राप्तीचे गुज दाखवले आणि देवाला मानवी चेहरा आणि माणसाला देवत्वाची झळाळी दिली ,भक्ती मार्गातून मोक्ष प्राप्तीचे मार्ग दाखवले हीच संत परंपरा सागरच्या ह्या कवितेत दिसूनय़ेते ,
आनंदाचा डोह, पांडुरंग
संत हि प्रवृत्ती आहे नावाची लेबले फक्त आपल्या सोयीसाठी लावायची मग ते नाव तुकाराम असो अथवा सागर असो. 
भाव तेच आणि सत्प्र्वृत्तीही तीच सर्व मोहातून बाहेर पडण्याची" विसरला लोभ, विसरला मोह
पाहिले डोळिया, पांडुरंग रावोआता नेत्र जाओ, मिटूनिया" इच्छिणारे संत हे कालातीत असतात कारण ती एक प्रवृत्ती आहे ती ज्याच्या मनात प्रगटते आणी लेखनात विचारात उमटते तो संत मग तुकोबान सारखा देशी वेषातला आसो कि सागर सारखा अद्यावत असो सत्प्रवृत्ती एकाच आणी त्यांचे गण गोत हि एकच .


नमन हि त्याची आणि एक कविता , ज्ञानाच्या तेजो रूपाने भारावलेला कवी नमन मधून नुसता दिसताच नाही तर प्रगटतो" चिर अमरचि होतो ज्ञान ज्याला मिळे तो
परम अढळ स्थानी फक्त ज्ञानीच जातो"म्हणत ज्ञानाची महती गातो उपमा आणी अलंकारांनी सजलेली हि सागराची कविता पंडीत कवी कालीन काव्याची आठवण करून देते

अविरत रत अभ्यासात मेधा जयाची
दवडत क्षण नाही शारदा फक्त त्याची


ढग जल भरलेले ज्ञानवंताप्रमाणे
उचितचि उपमा ही ज्ञान पाण्याप्रमाणे

हि दोन कडवी यमक्या वामनाची आठवण ताजी करते ,
सारंगच्या ह्या दोन कविता त्याच्या संत आणी पंडीत काव्याच्या संस्काराचे आगळे वेगळे रूप आहे ते इथेच संपत नाही ,श्रीकृष्णाच्या बालरूपाने आपल्या उघडलेल्या मुखात ब्रम्हांडाचे दर्शन यशोदेला करवले ,सागराच्या कवितेत सारंग करवतो ,
सारंग जे लिहितो ते विसरता येत नाही ,त्याची आठवण मनातून जात नाही ,
शब्दशाह सारंगला मैत्राय़ाणा चे शब्दशः सलाम .
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

No comments: