Translate

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

ऋग्वेदातल्या ऋचा

Thursday, August 16, 2012


चिरंजीव ऋग्वेद ,

चिरंजीव ऋग्वेद ,
सप्रेम आशिर्वाद,तुझा निरोप मिळाला ,माझा लेख आवडला त्या बद्दल धन्यवाद,ऋग्वेद तुझा अवेळीचा पाऊस ,आणि सांज ह्या दोन्ही कविता ,मन मोहवून गेल्या ,ह्या दोन्ही काव्यात सांगितलेला घटना सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातही घडतात पण तुझ्या सारख्या कवींना मात्र त्यात काव्य दिसते म्हणून तर म्हणतात "जे न देखे रवी ते देखे कवी"तुझी कविता एक बंदिश वाटते शब्दात बांधलेली पण भावात भावनांना मोकळी करणारी,ऋग्वेद तू नावाप्रमाणेच ऋग्वेद ,तू मला आहेस ऋचाने बनलेला एक वेद ज्याच्या प्रत्येक ऋचेत मंत्र साधना आणि सामर्थ्य आहे ,मानवी मनाच्या स्पंदनाची भावगर्भ आवर्तने ह्या कवितेत आढळतात.,तुझ्या कवितेचे यथायोग्य वर्णन करण्याची क्षमता माझ्या शब्दात नाहीच नाही,तू मला भेटायला येशील तेव्हा मनात कृतज्ञतेचे उठणारे भाव म्हणतील "पुंडलिका भेटी परब्रम्ह आलेगा".माझा दूरध्वनी क्रमांक ९८२१४५८६०१ आहे.
शशांक रांगणेकर.

Tuesday, August 14, 2012


ऋग्वेदातल्या ऋचा

ऋग्वेदातल्या ऋचा
जे जे पंचा महा भुतांच्या लळीताशी ,निगडीत असते मग ते काव्य असो गद्य असो ते अक्षर असते.म्हणून तर वेदांची गणना अक्षर वान्ग्मायात झाली आहे.ज्या क्षर नाही ते अक्षर ,पंचमहाभूतांची ललिते अशीच चालू राहणार ,त्या ललीताना आपल्या कवितेत गुंफणारे काव्य अलोकिक आणि अजरामर ठरते ,कारण निसर्गाच्या लीला कायम असतात पण कवीच्या मनात त्यांना पाहून भाव मात्र बदलत असतात ,निसर्गाशी जवळीक साधत केले गेलेले काव्य अप्रतिम ठरते.मग ते मेघदूत असो अथवा ऋग्वेद चे अवेळी पाऊस असो आर्तता तीच ,हृदयातला ओलावा तसाच,म्हणून हा पाऊस ओले चिंब करतो ,नसा नसातल्या विरहाला जागवतो ,अतिशय नाजूक आणि भावस्पर्शी शब्दांचा फुलोरा फुलवणारी ह्याची कविता एक अप्रतिम कविता.शब्द भाव आणि सूर ह्याचा आरस्पानी नजराणा घेऊन आलेला हा "अवेळी पाऊस"नुसताच हवा हवासा वाटत नाही तर सतत बरसावासा
वाटतो..
ऋग्वेद चे काव्य सर्वगामी आहे ,आयुष्यातल्या टप्प्या टप्प्यातले हिशोब सांगणारे,मैत्रीच्या रमल खुणा आरस्पानी शब्दांच्या मीना बाजारात मांडणारे अथ पासून इति पर्यंतचा प्रवास अतिशय सुरेलपणे पार पडणारे.लोभस मोहक तरीही परखड. सांज हि कविता मैलाचा दगड ठरावी इतकी लक्षणीय.
ऋग्वेद हा कविता संगीत आणि निर्मिती ह्या तीनीही क्षेत्रतात प्रकाशणारा सायंतारा आहे ह्याच्या चांदण्यात केवळ शब्दांचीच रोषणाई नाही तर माणुसकीची हि उब भासते.,;ऋग्वेद ला मैत्रयाणाच्या शुभेच्छा.
शशांक रांगणेकर मुंबई ,
९८२१४५८६०२