तुषार जोशी ,
मराठी ब्लोग्स वर लिहिणारे जे कोणी साहित्यिक आहेत त्यात नागपूरचे तुषार जोशी ह्यांचे नाव
अग्रगण्य ,ठरावे ,अष्टपैलू लेखन ,आयुष्याच्या सर्व अक्षांश रेखांशाना स्पर्श करणारे बहुआयामी साहित्य ,आणि भावांचे अचूक वेध घेणारे शब्द प्रभुत्व हि त्यांच्या लेखनाची काही ठळक वैशिष्टे ,.
आजच तुषारची आलं पाहिजे हि कविता वाचनात आली आणि वैदर्भीय प्रेमाची पोत कळून चुकली ,तुषारची हि कविता म्हणजे एक खर्या अर्थाने प्रेमकाव्य ठरावे ,फक्त रंग रूपाच्या आणि श्वास निश्वास च्या तकलादू शब्दाजालाला ओलांडून विश्वासाचे रूप घेते तेव्हा प्रेमाचे ते रूप आभाळमाया बनते ,
माणसाने माणसासाठी केवढे मोठे व्हावे ह्याची एक याद्च हि कविता देऊन जाते
, डोंगर होता आलं पाहिजे
पाय जमिनित घट्ट रोवून
येणाऱ्या प्रत्येक वादळाला
आव्हान देता आलं पाहिजे
डोंगर होता आलं पाहिजे
माणसाच्या माणूसपणाला ईश्वरीय शक्तीची कवच कुंडले धारण करता आली पाहिजेत म्हणून सांगणारी हि कविता "अहं ब्रम्हस्मी म्हणणाऱ्या अपौरुषेय साहित्याला स्पर्षून जाते ."माणसाच्या लौकिक सीमा रेखांना ओलांडून परमेश्वरीय संकेतांना तेजस्वी रित्या मानवी चेहरा देऊन जाते .
जीवनाच्या सर्व भाव भावनांना आणि वेदानाना स्पर्शून जाणारे साहित्य हि तुषारची खासियत ,नागपुरी संत्र्यासाराखेच ,सगळ्या रसांची चव दाखवणारे ."आईच्या पदरा समान दुसरा आधार आहे कुठे
मायेचे धन लाभता धन गडी प्रासाद सारे थिटे"म्हणत मातृत्वाचे उबदार पांघरुण पांघरणारे ,आणि
"म्या तिले म्हनलं
तुह्यापातुर खुबसूरत कोनिच न्हाई
तुले भेटाया दिल आतुर व्हतो
भलतीच सरमावली थे
आन मंग हडुच म्हने खुटं बी बोलीव
म्या येका पायावर येतो"
म्हणत इष्काचे रंग उधळणारे .
कुठेही एकाच विचाराच्या भोज्या ला न चिकटणा रे सर्व वाटांनी रसिकांना फिरवून आणणारे साहित्य
महाभारत आणि रामायण हि दोन भारतीय संस्कृतीचे भाव स्त्रोत ,महाभारताबद्दल तर व्यासोत उत्तीषट्म जगत सर्वं असे म्हणतात ,आणि म्हणूनच सर्व भाव भावनांना फुलवणारे साहित्य अनमोल आणि अक्षर ठरते
तुषारचे बहु आयामी लेखन फार महत्वाकांक्षी आहे जीवनाच्या सर्व भावभावनांना आपला सुगंधी स्पर्श देणारे हे साहित्य केशवसुतांच्या दोन ओळींची आठवण करून देते "खादाड असे माझी भूक चतकोराने मला न सुख "
भाव भावनांचे तुषार उधळण्या तुषार जोशींना मैत्रायाणा चे सलाम .