Translate

मंगळवार, १६ डिसेंबर, २०१४

फाटकांचा प्रसाद



फाटकांचा प्रसाद
माझे स्नेही माधव फाटक ह्यांचा पुतण्या चि. प्रसाद फाटक ह्याची मुलाखत शनवार दिनांक १३.१२ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी वर प्रसारित झाली ,फार आनंद झाला
फाटक सरांची आणि माझी ओळख काही फार जुनी आहे अशातली गोष्ट नाही पण माणसाच्या आयुष्यात कधी कधी चमत्कार घडतात आणि मैत्रीचे बंध नकळत जुळतात ,आणि इथे तर मैत्री व्यक्ती शी नव्हती तर संपूर्ण घराशी जुळली होती ,मालिकांच्या भाषेत सांगायचे झाले तर फाटक परिवाराशी मैत्री जुळली आणि बंध अतूट झाले .एक घरच माझे झाले होते आणि माधव चे मित्र हि ओळख पुसट होऊन पप्पा हे नामांकन कधी पक्के झाले ते कळले पण नाही .विले पार्ले येथील तेजपाल स्कीम येथे राहणाऱ्या फाटक मंडळींशी माझी मैत्री हा एक ईश्वरीय संकेतच नव्हे तर प्रसादच आहे असा माझा धृढ विश्वास आहे.

सामान्य दिसणारा माणूस किती असामान्य असतो ह्याचे उत्तर फाटक परिवाराशी ओळख झाल्यावाचून कळत नाही,बहुश्रुत असूनही ज्ञानाचा गर्व नाही ,पांडित्य असूनही विचारांची जडता नाही आर्थिक सुस्तिथी असूनही झगमगत्या खोट्या दिव्यांची रोषणाई नाही देवघरातल्या नंदादीपाची आणि मनाच्या गाभाऱ्यात उजळणार ज्ञान दीपाची सारखीच काळजी घेणारे एक सुसंकृत घर अशी घरे फक्त घरे नसतात तर संकुले असतात ,संस्कृती ,शालीनता ऋजुता अभ्यास बहुश्रुतता अश्या अनेक सद्गुणाचे टोप पदरी पैठणीचे महावस्त्र लेऊन हि घरे खऱ्या अर्थाने समाजाची नियत सांभाळतात,सामाजिक संस्कृती खऱ्या अर्थाने हि घरे रुजवतात .
समाजातल्या सर्व विचारांच्या संतुलनाचे बहु मुल्य काम हि घरे करत असतात आणि अश्या घरांमुळे सामाजिक संतुलन शाबूत राहते.
फाटक परिवारातल्या श्री विनायक दादा आणि सौ सुनंदाताई उर्फ बाई ह्यांचे चिरंजीव प्रसाद ,वडिलांची खेळाडू शिस्तप्रिय वृत्ती आणि आईचा गाता गळाआणि घराण्याकडून वारसा हक्काने आलेले अनेक सद्गुण घेऊनच जन्माला आला आहे.मराठी भाषेत एक म्हण प्रचलित आहे "खाण तशी माती आणि माय तशी पुति ",तुकाराम बुवा सांगून गेले आहेत "शुद्ध बीज पोटी फळे रसाळ गोमटी .माता पित्यांचे सर्व सदगुण पुत्रात आढळतातच असे नाही किंबहुना पाहिया पिढीत सद्गुण वापरले गेल्याने पुढच्या पिढीच्या वाट्याला ते येत हि नाहीत म्हणूनच "आई वडील किती चांगले होते नाही तर हा ? असे खेदोद्गार बऱ्याच वेळेला ऐकू येतात ,पण प्रसाद च्या बाबतीत मात्र आई वडिलांनाच नव्हे तर सर्व प्रियजनांना "पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी फडके झेंडा "असे वाटते . फाटक परिवाराला दैवाने किवा देवाने किव्हा दोघांनी एकत्र येऊन एक उजव्या हातानी एक दान दिले आहे ते म्हणजे त्यांची पुढची पिढी . प्रसाद ,अमोल ,अमोघ आणि समीर फाटकांची पुढची पिढी प्रसाद ह्यातील सर्वात जेष्ठ . सर्व भावंडे एकोप्याने आणि एकजुटीने वागून घराला घर पण कसे देतात ह्याचे उत्तम उदाहरण प्रत्येक मराठी घराने ह्यापासून जरूर बोध घ्यावा .
प्रसाद हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तो उत्तम खेळाडू आहे ,उत्तम तंत्रज्ञान विभूषित अभियंता आहे ,उत्तम गझलकार आहे ,चपळ खेळाडू आहे ,प्रशासक आहे ,पार्ल्याहून चर्चगेट ला जाऊन यावे इतक्या सहजपणे जगप्रवास करणारा उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचा विक्रेताही आहे खनिज उत्खननासाठी लागणाऱ्या यंत्राचे दिसिनिंग हि ह्याची खासियत आहे आणि ह्या क्षेत्रातला आंतरराष्ट्रीय  दर्जाजाचा विशेषज्ञ म्हणून भारतातच नव्हे तर जगभर प्रख्यात आहे. कोळशाच्या खाणींवर एक विशेषज्ञ म्हणून हा प्रख्यात आहे . कोळश्याच्या खाणीचे काम करूनही हात स्वच्छ असलेला माणूस मिळणे विरळा .

कलावंत अनेक असतात कलेच्या क्षेत्रात बहुमानाचे अनेक योग त्यांच्या आयुष्यात येतात पण मी कोणासाठी काहीतरी केले आहे असे समाधानाचे क्षण कधीतरीच त्यांच्या आयुष्यात येतात प्रसाद हा केवळ उत्तम कलावंतच नाही तर माणुसकीचा चेहरा बाळगणारा कलावंत आहे ,स्त्रियांच्या प्रश्नांवर समाज प्रबोधन करावे म्हणून त्यांनी काही कार्यक्रमांची आखणीही तो करतो आहे.

प्रसाद उत्तम गायक आणि कवी हि आहे ,त्याचे दोन आल्बम प्रसारित होताहेत ,नवोदित गायकांना वादकांना संधी देण्याचे एक महत कार्य प्रसाद करतो आहे .त्य आल्बमच्या अनुषंगाने दूरदर्शनवर त्याची मुलाखत प्रसारित झाली होती ,त्या मुलाखती वरून प्रसादच्या गुणांचे तुल्यामापन करणे चुकीचे ठरेल ,त्याच्या गुणाच्या वर्णनाला `` शब्दांचे मोजमाप केवळ अपुरेच ठरेल ,जिथे शब्द थकतात तिथे भाव कामी येतात ,त्याची अनेक रूपे अनेकांना ज्ञात आहेत पण मला मात्र ज्ञात आहे "फाटकांचा प्रसाद"म्हणूनच .
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२





--




From The Dessk of Shashank
207 B,Planet Industrial Premises Co-op Society Limited,
Subhash Road, Vile Parle (East) ,
Mumbai - 400 057 India
Tel :91-022- 26144220,91-022-26120460
Fax : 91-022-26135682

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

श्रीरंग राजेंद्र भावे

Thursday, July 21

परमेश्वर हा एखाद्या मनस्वी कलाकारा प्रमाणे आहे त्याची एखादी निर्मिती इतकी मनपूर्वक करतो की त्याला तोड नाही असे वाटते ,रुप रंग आवाज आणि बुद्धी ह्या सर्व सद्गुणांची पखरण करून अजोड कलाकृती हा मानसीचा चित्रकार निर्मितो अशीच एक परमेश्वरीय कलाकृती काल दिनांक २४.०४.रोजी बघायला मिळाली ह्या ईश्वर निर्मित कलाकृतीचे नाव आहे "श्रीरंग राजेंद्र भावे ".पार्ल्यातील" पंचमी " ह्या संस्थेने पेश केलेल्या भावगीतांच्या कार्येक्रमात आपल्या अजोड गायकीची चुणूक ह्या कलाकारांनी दाखवली ,गळ्यात गांधार बाळगून आपल्या भावपूर्ण गीत गायनाने समोर बसलेल्या श्रोत्यांना १५ ते २० वर्ष पूर्वीचा भावगीतांचा कालखंड उलगडून दाखवला त्याचे गायनाच नव्हे तर अस्तित्वही परमेश्वरीय भासत होते ,मराठी युवक असावा तर कसा ह्याचे एक सर्व गुण शुद्ध उदाहरण..उच्च विद्या आणि कला भूषित अश्या ह्या कलाकाराच्या कलाविष्काराला पाहून एक काव्य पंक्ती आठवली " अनंत हस्ते कमला कराने देता किती घेशील दो कराने." परमेशाने अनंत हस्ताने केलेली पखरण ज्या कर द्वायाने सांभाळली ते करद्वय हि कसे असतील तेव्हा नकळत लक्ष गेले हातांकडे खरोखरच सुबक आणि सुघड कलाकारी हात परमेश्वराची बिनचूक कलाकृती. जग जिंकायला निघालेल्या ह्या "परी कथेतल्या राजकुमाराच्या "चेहऱ्यावर हे विनम्र पण
आत्म विश्वासीत "जितं मया"भाव आले कुठून ?उत्तर आले "हे तर नक्षत्रांचे देणे"
शशांक रांगणेकर 
मुंबई 
९८२१४५८६०२

बाजी दराडे

Thursday, July 21, 2011


बाजी दराडे 

मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ह्या दोघीही रत्न गर्भा आहेत
face
बुक च्या माध्यमातून बरेचसे कलंदर शिलेदार आपापली
मुलूखगिरी करताहेत ,समाजशास्त्र पासून मानसशास्त्र पर्यंत आणि
गाथे पासून कथे पर्यंत सर्वायामी संचार करणारी हि मंडळी मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान जोपासतात आहे शतप्रतिशत मराठी असलेल्या ह्या मराठी सुपुत्रांना गुण गाईन आवडी चा सलाम.ह्या शिलेदारांमाधले एक बिन्नी चे नाव "बाजी दर्डे"
नावाप्रमाणेच सर्वच लेखन प्रकारात विचारांची बाजी धगधगीत शब्दाने मारणारा हा छोटा शिलेदार कर्तृत्वानी आणि विचार
संपदेने यशाची शिखरे गाठतो
परमेश्वर हा कृपाळू आहे ह्या बद्दल शंकाच नाही , आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोण भेटेल हे कदाचित नियतीही सांगू शकत नाही
वयाची ६२ वर्षे पुरी करता करता ह्या बळीच्या दरवाज्यात एक २६ वर्षीय वामन येतो आणि बुद्धी वाणी आणि विचार पदक्रांत करून चौथे
पाउल कुठे ठेऊ म्हणून विचारतो त्याला बळीने उत्तर काय द्यायेचे?देण्यासारखे राहते तरी काय सदैव हाच प्रश्न छळत राहतो ,
माझा मित्र बाजी दराडे जेव्हा जेव्हा मला भेटतो अथवा माझ्याकडे बोलतो तेव्हा तेव्हा हा यक्ष प्रश्न माझ्या समोर उभा राहतो
ह्याला कुठल्यातरी वैचारिक खिंडीत गाठायचे म्हंटले तर ह्या शिपायाने ती खिंड अगोदरच पावन केलेली असते ,साहित्य ,काव्य विचार
लिखाण सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा हा माझा छोटा मित्र आता गणेश उत्सवासाठी गाणी लिहिणार आहे तिथेही तो बाजी
मारेलाच ह्या बद्दल शंकाच नाही ". पुणे तिथे काय उणे "मित्रानो बाजी पुण्याचः आहे.
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२








प्रसाद नामदेव चव्हाण

Wednesday, May 30, 2012


प्रसाद नामदेव चव्हाण

प्रसाद नामदेव चव्हाण
काही काही भेटी ह्या आयुष्यात ,योगायोगानेच होतात ,आणि ते योगायोग आयुष्यात बरचसे काही तरी देऊन जातात.नशीब माझ्यावर मेहरबान आहे ह्या बद्दल काही शंकाच नाही.नाहीतर माझ्या सारख्या अत्यंत सामान्य आणि सुमार माणसाला एवढी चांगली माणसे मित्र म्हणून का मिळवीत.उत्तर एकाच "खुदा देता है तो छप्पर फाडके देता है "मित्र म्हणून मला मिळालेल्या ह्या असंख्य व्यक्तींचे ऋण विसरावे म्हंटले तरी विसरू शकत नाही एवढे मोठे.त्यांच्या सुहृदतेचा झालेला सुवर्ण स्पर्श कायमचा ठसा उमटवणारा.

माझ्या मित्रपरिवारात मला काका म्हणून ओळखतात .पण वागतात जिवलग मित्रा सारखे. आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या आयुष्यातली नवी कोवळी उन्हे माझ्याशी शेअर करणारी हे तरुण वयातल्या अंतराचे भान दाखवत नाही पण विसरत हि नाहीत ,मैत्री आणि आदर एक सुरेख चित्रण ह्यांच्या वर्तनात नेहमीच जाणवते .नव्या पिढीचा मी शतशः ऋणी आहे.ह्या मित्रांच्या नामावलीतले एक तारांकित नाव "प्रसाद नामदेव चव्हाण ".

दुर्गा सखा संस्थेचा एक खंदा कार्यकर्ता ,आणि आमच्या मनूचा भाऊ ,चुलत भाऊ म्हणत नाही कारण प्रेम सख्या भावान पेक्ष्याही जास्त.नाते काय असावे किती असावे आणि कसे असावे ह्या सर्व ककारांचे समर्पक उत्तर .मनु दादा आणि प्रसाद म्हणजे आजचे राम लक्षमण ,दादाचे प्रसाद वरचे प्रेम आणि प्रसादला असलेला दादाचा अभिमान ह्याचे मनोहारी चित्रण नेहमीच दिसते.
प्रसाद हा उत्तम छाया चित्रण करतो ,छायाचित्रण चव्हाणांच्या रक्तातच आहे.पण प्रसाद नुसताच फोटो काढत नाही तर ते सजीवही करतोअशी ह्याची छायाचीत्रणे आहेत .
आजची पिढी काहीच वाचत नाही सुसंस्कृत नाही ह्या आक्षेपाचे उत्तर म्हणजे प्रसाद.साहित्य कविता इतिहास ,संत साहित्याचा अभ्यास ह्या सर्व अलंकाराने सालंकृत असलेले प्रसादचे व्यक्तिमत्व फारच लोभस आहे.
प्रसाद ची माझी भेट नुकतीच झाली आदिवासी पाड्याला जाताना तो आमच्या बरोबर होता खरे म्हणाल तर आम्ही त्याच्या बरोबर होतो ,निसर्गाचे अनादी आणि अनंत रूप आपल्या तृतीय नेत्रात तो सामावून घेत होता त्याच्या छाया चित्रणाची पोत काही वेगळीच निसर्गाशी जिवंत जवळीक साधणारी.एक प्रगल्भ कलाकारीची जाण असलेली .लहान वयातही मनाचा मोठेपणा दाखवणारी.पण तरीही तरल आणि सुगम.
आयुष्याचा सारीपाट खेळताना पडणारे प्रत्येक दान उजवच असेल असे नाही हे ज्याला उमगले तोच खरा ज्ञाता आणि जेता हि .प्रसाद मध्ये ह्या प्रासादिक
गुणांना मैत्रयाणाच्या हार्दिक शुभेच्छा.
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२

1 comment:

प्रसाद चव्हाणsaid...
काका मला माहित नाहीये कि तुम्ही लिहिलेल्या या सुमानांसाठी
मी लायक आहे कि नाही पण त्यावर तुकोबारायांचा एक अभंग आठवलाय तो लिहितो




आजिचे हे मज तुम्ही कृपादान l दिले संतजन मायबापी ll१ ll



आली मुखावाटा अमृतवचने l उत्तीर्ण ती येणे नव्हे जन्मे ll२ ll



तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ l शृंगारिले बाळ कवतुके ll ३ ll

हे म्हणजे खरच सूर्याने एका लहानशा पणातीस... ओवाळणे होय...








दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो

Monday, August 13, 2012


दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो

दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो
सगुण परमेश्वराची आराधना करणे हि सामान्य माणसाची उपासना पण पर्वत शिखरावर दऱ्या खोऱ्यात निसर्गाच्या सानिध्यात परमेश्वराला निर्गुण रुपात पाहणे हे फक्त योग्यालाच शक्य असते,निसर्गा कडे चला हा संदेश घेऊन ,तुमच्या कडे आलाय एक योगी नाव "सगुण भडकमकर"
सगुण हा खऱ्या अर्थाने पर्यावरणवादी आहे.निसर्गाच्या कुशीत जाऊन एकदातरी आभाळमाया अनुभवल्या शिवाय,शिवाय रान वारा फुफ्फुसात भरून घेतल्या शिवाय शहरी आयुष्याला पर्याय नाही हे आजकाल सर्वांनाच पटते आहे ,
सगुण ने आपल्या अथक परिश्रमाने मुरबाड जवळ एक मय सभा निर्माण केली आहे ,शत प्रती शत पर्यावरण वादी बांध काम,निसर्गाचे रौद्र रूप दाखवणारा तर कधी कधी अलुगुजासारके मंजुळ स्वर घुमावणारा रान वारा,हिरव्याकंच हिरवळीची शेलारी पांघरलेली सवाष्ण दरी आणि सोनेरी प्रकाश रेखा पसरवणारे कोवळे उन ,डोंगरांना डोळे मिचकावत मिचकावत ढुश्या देत देत पाळणारे ढग आणि इदं न मम म्हणत पर्वतावरून कोसळणारे जल प्रपात सारच काही काव्यमय ,सगुणाच्या ह्या प्रकल्पाचे नावच आहे हिरवे स्वप्न,खरोखर असे वाटते कि आयुष्यात एकदातरी निसर्गाचे हे मनमोहक रूप डोळे भरून बघावे ,एकदातरी तो पश्चिम वारा फुफ्फुसात भरून घ्यावा आणि ,शरीराचा रोम न रोम पुलकित करणारे निसर्ग स्पर्श अनुभवावे ,कदाचित हा तेजोमय स्पर्शच मनावरची काजळी पुसून उर्वरित आयुष्य लखलखीत करेल ,हेव्या दाव्याचे रुपया पैश्याचे ,देण्या घेण्याचे जग क्षण भर विसरता येईल आणि तो क्षण भरचा अमृत स्पर्श उर्वरित आयुष्य सुगंधित करेल.
सगुण हा एक उत्तम प्रकल्पक आहे विज्ञान आणि प्रकृती च्या हातात हात गुंफून त्याने हा प्रकल्प रेखाटला आहे ,आजच्या माणसाच्या गरजा आणि त्या गरजांची पूर्तता ह्यांची उत्तम सांगड त्यांनी इथे घातली आहे.
शून्यातून विश्वाची निर्मिती करताना शून्यालाच शरण जावे लागते ,आदि अंत जिथे संपतात ते शून्य ,सागुंच्या ह्या शून्यात सर्जनाचा एक आगळावेगळा अविष्कार आहे ,,सगुण ची माहिती त्याच्या वेब साईट वर नक्कीच मिळेल पण निर्गुण रूपातल्या सगुण ला पहायचे
असेल तर पळू लाच जावे लागेल ,कारण ते भावांकन शब्दात करण्याचे सामर्थ्य माझ्या तरी शब्दात नाही.
पाळूहून निघताना संध्याकाळ रात्रीकडे सरकत होती निसर्गाचे तेजोरूप मनातून निसटत नव्हते ,,एका निर्गुण स्वरूपी सगुण मनात रुजला होता ,त्याची अथक मेहनती वृत्ती ,आणि त्याच्या रोमारोमात प्रगट णारे निसर्गायण ,साऱ्याची रानभूल मनावरून उतरली नव्हती ,त्या वेळी सगुणची  आठवण दोन ओळीत आली "दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो."
निसर्गाच्या ह्या सगुण रुपाला मैत्रयाणाचे लक्ष लक्ष अभिवादन
शशांक रांगणेकर
मुंबई ९८२१४५८६०२

 

गुंतता हृदय हे

Friday, August 31, 2012


गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे ,
र.स.प ची कविता वाचतो तेव्हा असाच वाटते ,कि ह्याच्या कवितेत आपण फार गुंतलो जातो,शब्द आणि भावनांच्या  मायाजालात असा गुंतवतो कि आत गेल्यावर बाहेर यायचे रस्तेच बंद ,ह्याच्या कवितेच्या बंदिशालेतले तुम्ही एक बंदीच,आणि ह्याच्या शब्दांची उबदार शेलारी ने तो बंदिवास नुसताच सुसह्य नव्हे तर हवा हवासा वाटतो,
ह्याच्या ब्लोग वर मी सफरीला गेलो तेव्हा कळले की हि आकाश गंगेची सफर आहे अगणित ताऱ्यांचे तेज सामावून हि आकाश गंगा लखलखते आहे ,हि अनंत आहे अगणित आहे ,गद्य पद्य ,चित्र ,साहित्याच्या आणि कवितेच्या सर्वांगानं स्पर्शून सुगंधित झाली आहे,नादोमय तेजोमय साहित्य च्या अगणित बुट्ट्या ची पैठणी नेसून आलेली कुल वधू च , जणू.
रसप ला परमेश्वराने कुठल्या मुशीतून घडवले आहे ते कदाचित तो हि विसरला असेल कारण तो असे चित्र तो कधीतरीच काढतो ,खरे तर काढू शकतो नाहीतर व्यंग चित्र काढणे हा नेहमीचा उद्योग.एखाद्या बाग्वानाने सर्वच प्रकारची झाडे लावावी आणि त्या सर्वच झाडांना रसरशीत फळे यावीत तशी रसप ची साहित्यकृती आहे ,काहीही उणे नाही.
हा नुसताच शब्दांचा डोंबारी नाही तर शब्द आणि भावाच्या कुमार संभावातून साहित्याची निर्मिती करणारा निर्माता आहे.
ह्याची प्रत्येक साहित्यकृती हा एक अमर्त्य चिंतनाचा एक साक्षात्कारी अनुभव,पण तो आनंदानुभव घ्यायला आपलीच झोळी फाटकी असता कामा नये नाही तर देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.
गोड कसे लागते,चाफ्याचा सुंगंध कसा असतो ह्याची मोज मापे अंकात मांडताच येत नाही ,हा अमृतानुभव आहे कुठल्याही मोजमापात बंदिस्त न करता येण्या जोगा ,हा ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो ,रसप च्या साहित्याकृतीना मैत्रयाणाचे शुभाशीर्वाद
शशांक रांगणेकर
मुंबई

९८२१४५८६०२

 

फुलोरा

                                        

Friday, December 23, 2011

prathamesh shirsat

गुण गाईन आवडी

केशवसुत,सुरेश भट,ग.दि.मा,grace ,गुरु ठाकूर,शान्ता शेळके,मराठी कवींची काही नावे,ज्यांच्या शब्दाने मराठी कवितेला कल्पनेच्या पंखांबरोबर वास्तवाचा मृदगंधहि बहाल केला,ह्या परंपरेला

साजेसलिहिणारा आणि एक "सायंतारा "मराठी काव्याच्या गगनात प्रकाशतो आहे '"प्रथमेश शिरसाट"वास्वाचे भान ठेवत शब्दाचा तरल फुलोरा फुलवत हा कवी जेव्हा म्हणतो"इथे कलेला किनारा नाही"

तेव्हाच कळत कि हाची कविता किती आशय घन आहे ,मनात उमटलेल्या वादळाला चित्रित करणारे ह्याचे शब्द जेव्हा मानवी मनाचे कंगोरे दाखवतात तेव्हा कळत कि खरोखर ह्याच्या काव्याला किनारा नाही

शशांक रांगणेकर

Thursday, December 22, 2011

satej padval

गुण गाईन आवडी
तरुण पिढी बिघडते आहे ,लहान मोठ्यांचा काही धरबंधच नाही ,जेष्ठांची ओरड ,कारण नसताना ,आजची पिढीही तेवढीच विनम्र आहे ,"सतेज पडवळ"नावाचा एक fb माझा मित्र आहे
वय वर्षे २१ अथवा २२ .बोलताना मला त्यांनी मित्रा म्हणून संबोधले ह्यांनी मी जेवढा सुखावलो त्यापेक्षा कितीतरी पटीने तो हळहळला,आपली एक अक्षम्य चूक झाली आहे असे त्याला
वाटते ,आणि हि चूक न चुकता त्यांनी करावी असे मला वाटते ,असो थोडक्यात सांगायचे कि आजची पिढीही आमच्या एवढीच सुशिक्षित विनम्र आणि सोज्वळ आहे ,आपल्या पाल्यावर
उत्तम संस्कार केल्याबद्दल त्याचे पालक आणि तो दोघेही अभिनंदनास पात्र आहेत.
शशांक रांगणेकर

vrukshavalli amha

वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे ,तुकोबांचा एक अभंग ,निसर्ग आणि मानवाचे अतूट नाते ह्या अभंगात सांगितले आहे ,ज्याला हे नाते कळले त्याला परमार्थ कळला ,निसर्गच माणसाचा गुरु ,"बंदगी तो
अपनी फितरत है खुदा हो न हो असे म्हणत अव्यक्त निर्गुण परमेश्वराचे व्यक्त रूप जे निसर्गात दिसते त्याची मानसपूजा करणारा माझा एक मित्र "श्रीश देशपांडे"त्याने नैसर्गिक सौंदर्याचे टिपलेले एक अप्रतिम छाया चित्र'निर्गुण परमेश्वराची सगुण रूपे दाखवणारा श्रीश हा खरोखरच सात दिवसाच्या विश्रांती नंतर परमेश्वरानी निर्मिलेली अप्रतीम कला कृति.

ajay naik

प्रिय जनहो,
,मराठीत एक म्हण आहे "जाती साठी माती खावी ",आणि आम्हा सर्व मराठी माणसांची एकच जात आहे ती म्हणजे मराठी ,आपल्या एका मराठी युवकाने एका
सिनेमाची निर्मिती केली आहे नाव आहे सतरंगी ,थोड्याच दिवसात तो प्रदर्शित होईल,आपली सुखाची नोकरी सोडून त्याने हे धाडस केले आहे,
मराठी कलाक्षेत्राची सेवाकारताना त्याला तुमच्या सहकाऱ्याची जरुरी आहे ,सतरंगी च्या यशाचे तुम्ही शिल्पकार ठरणार आहात ,सतरांगीला मनापासून
पाठींबा द्या ,चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पहा ,प्रश्नतुमचा हा चित्रपट आम्ही का पाहावा ? उत्तरहि तुमचेच "हा सिनेमा एका मराठी मुलाने काढला आहे "अजय नाईक" ने .
शशांक रांगणेकर

Thursday, October 13, 2011

snehal

गुण गाईन आवडी
स्नेहल पोतदार ,नावाप्रमाणेच एक प्रेमळ व्यक्तिमत्व ,नावात काय आहे म्हणतात पण स्नेहलच्या नावातच त्याचे व्यक्तिमत्व सामावलेले आहे, त्याची शब्दाशब्दात
एक स्नेहाचा धागा दडलेला आढळतो ,एक उभारता उद्योजक,स्व कर्तृत्वावर याचाची वाट चोखाळणारा हा तरुण उद्योजक,पण व्यावासिकातेने त्य्च्यातला माणूस विझलेला
दिसत नाही तर त्याच्या माणुसकीने व्यावासिक तेला गहीरे रंग दिले आहेत ,तो जेवढा यशस्वी उद्योजक आहे तेव्हढाच मोठा माणूस,आपल्या आईचे ऋण कधीही न विसरणारा
एक सुपुत्र ,माणुसकीचे नाते मनात आणि शब्दात जपणारा स्नेहल .
शशांक रांगणेकर

Thursday, September 15,                                        फुलोरा 

देव तारी त्याला कोण मारी

देव तारी त्याला कोण मारी
देव तारी त्याला कोण मारी ,असे म्हणतातआणि हा देवाचा आशीर्वाद जर निशब्द येत असेल त्याचे रूप गंध फारच मनोहारी असतात.काही कविता भाषेला संपन्न करतात आणि कवी जनमानसाला."मराठी कविता संपली "म्हणणाऱ्या टीकाकारांना मिळालेले एक निशब्द उत्तर जे देवा घरून आले आहे.मराठी कविता अमर आहे अक्षर आहे सांगणारे हे उत्तर.
मराठी कविता हि मराठी माणसाची समाजाची एक हृदयस्थ जिवंत जाणीव,"राकट देश कणखर देश दगडांच्या देशा"म्हंटल्या गेलेल्या देशाचे रूप दिसते हळुवार कवितेत आणि ह्या  रुपाला रंग देतात कवी.
एक असाच शब्दांना भावांचा रंग देणारा एक कवी निशब्द देव.
अतिशय नाजूक तरीही अत्यंत प्रभावी शब्दात सुख दुक्खाचे मोहर फुलवणारी यांची कविता हि मराठी साहित्याला मिळालेली एक अनमोल भेटच आहे.
देवांची कविता जशी नाजूक आहे हळुवार आहे तशीच मानवी अपप्रवृत्तींवर कोरडे ओढणारी हि
आहे.
"गोष्टी नको नकोत्या सांगून लोक गेले ..हि अशीच एक सुन्न करणारी कविता अतिशय थोड्या शब्दात कवीची सल वेदना प्रकट करणारी त्याची कविता थेट वाचकांच्या हृद्याच भिडते.
मानवी जीवन सुख दुक्खांचा एक क्यालीडोस्कोप,  प्रत्येक क्षणा  बरोबर काचांच्या आकृत्या बदलत असतात.सुख कधी कुठे संपते आणि दुखाची झळ लागत जाते ते कळातही नाही.सुख्दुखाच्या ह्या लहरींवर मानवी जीवन तरंगत असते आणि नेमकी तीच अस्थिरता ह्या कवीच्या कवितेत डोकावून जाते.
ह्या देवांची मला भावलेली एक कविता "म्हणून तू रडली होतीस न आई ,"हा लेख लिहिता लिहिता मला ती वाचायला मिळाली ,लहान मुलाच्या मनातले निरागस दुख्हाचे कढ,देवा रे देवा किरी भन्नाट लिहितो माणूस अगदी फोडां प्रमाणे ठसठसणाऱ्या अगतिकतेकी नेमकी पण निरागस सल.दाखवतो आणि तरीही तू मला पाहिजे ते सर्व दिल होतस म्हणत समाधानाची साय हि पसरवतो .दुक्खाला शब्दांची झबली चढवणारी ह्याची कविता मातृत्वाचे मंगल स्तोत्र गाते. .आजची श्यामची आई आणि  तिचा श्याम आज ह्याच्या कवितेत दिसतो.

ह्याची कविता वाचकालाच निशब्द करते ह्याच्यावर चार शब्द लिहिण्याची ताकतही माझ्या शब्दात नाही हा माझा  लेख म्हणजे सूर्याला ओवाळणारी पणतीची ज्योत.निशब्द तुझ्या शब्द प्रभुत्वाची हि एक मैत्रायणाची प्रेमळ पावती समज आणि मान्य करून घे.
शशांक रांगणेकर मुंबई ९८२१४५८६०२

मनोज रंधे

नटराज शंकर हेभारतीय संस्कृतीचे ऐक अविभाज्यअंग ,आणि नृत्यकलाहे चौसष्ठ कलांपैकी ए श्रेष्ठतमकला  हा विश्वास.."राधा आणि कृष्णाची रासलीला "हा भारतीयसमाजाचा आवडता परंपरागत नृत्यप्रकार,
भारतीय साहित्त्यातले बराचेसे खंड ह्यादोन अनुभूतींच्या शब्दांकानात वर्णीत झाले आहेत,हळद आणि कुंकू ह्या जोडी प्रमाणे "गायन आणि नृत्य"हे  कलेचे  दोन्ही प्रकार हातात हात घालून येत ,गायन कलेप्रमाणे नृत्यकलेलाही लोकाश्रय बरोबर राजाश्रयहोता ,भारताच्या प्राचीन इतिहासापासून  ब्रिटीश पूर्व इतिहासपर्यंत गायन कलेएवढीच प्रतिष्ठा नृत्यकलेला होती .तन्जौअर,केरळ,अवध येथील शासक नृत्यकलेचे केवळ आश्रय दातेच नव्हेतर  उपसकही होते.
काळाच्या ओघात नृत्यकलेला एक  गौण दर्जाप्राप्त झाला .ए गौणदर्जाची कला असे रूप प्राप्त होऊन नर्तकाना "नाच्या"ह्या शब्दात संबोधलेजाऊ लागले ,ह्याकलेवर ऐक स्त्रैणछाप पडला तिचे शिव शंकरी रूप विलयास जाऊन , तिला लोककलांच्या वळचणीला जाऊन नाच्या रूपप्राप्त झाले नटेश्वराचे मरदानी  रूप जाऊन नाच्या चे क्लैब्यं कधी प्राप्त झाले ते कळलेसुद्धा नाही

स्वातंत्रोत्तर काळा परत एकदा नृत्यकलेला प्रतिष्ठा प्राप्तहोतेय ,भारत नात्याम,कत्थक ,मणिपुरी अश्या अभिजातनृत्यप्रकारा बरोबर ,पोवाडे ताब्लो नृत्यनाटिका अशा विविधसंयुक्त कला प्रकारांना अभिजनाकडून हिलोकाश्रय मिळतो आहे ,नाचआणि नाच्या ह्याशब्दात प्रतीत होणारी हीनभावना जाऊन नृत्यआणि नर्तक अश्याप्रतिष्ठित संबोधनाची जोड मिळतेआहे , अभिजानाचा लोकाश्रयआणि सामाजिक प्रतिष्ठामिळण्यासाठी "कित्येक गोपीकृष्ण ,पार्वतीकुमार आणि बिरजूमहाराजांचे अथक परिश्रमह्या च्या मुळाशीआहेत , कलेला प्रादेशिक अथवाराष्ट्रीय सीमा बंदिस्तकरू शकत नाही,पाश्चात्य नृत्य कलेचे अनेकप्रकार भारतीय प्रेक्षकाला रुचतीलअश्या प्रकारे सदरकरण्याचा मनोदय असल्याने त्याचेसादरीकरण मनोज करतो,आणि त्याच्या ह्याप्रयत्नांना अमाप लोकप्रियतामिळते आहे. ,
सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानेबरचसे युवक ह्याकलेचे उपासक झालेआहेत , असाच ऐककलोपासक नृत्याप्रेमी युवा जळगावचा"मनोजरंधे "
मनोज हा २१वर्षाचा युवक आहेवयापेक्षाही मोठे कर्तृत्वप्राप्त झालेला हा युवकनृत्याला आपला आत्मासमजतो ,नृत्य कलेला गतवैभव प्राप्त करूनदेण्याच्या स्वप्नाने झपाटलेला हायुवक प्रतिभा आणि अथकश्रम ह्यांच्या जोरावर हे ऐकउपेक्षि कला दालन पुनरोज्जीवितकरण्याचा प्रयत्न करतोय त्याचीऐक नृत्य संस्थाआहे ,त्या संस्थेचे बरेचसे कार्यक्रम विनामूल्य असतात ,,अभिजातनृत्य प्रकार आजच्या युवा पिढीलाआवडतील रुचतील अश्या प्रकारे सादर करणे समाजातल्या नाहीरे वर्गांसाठीनिशुल्क वर्ग चालवणे,लोककलांचे संशोधन सादरीकरणअश्या अनेक उपक्रमातव्यस्त असलेला मनोज युवा पिढीला ऐक आदर्श निर्माण करून दाखवतोआहे,आपल्या संस्थेद्वारा कित्येक युवकांना प्रगतीचा मार्ग दाखवतो आहे
विद्द्यर्थासाठी अतिशय अल्प मोबदल्याततर कधी कधीनिशुल्क प्रशालांचे आयोजन करणेहे ह्याचे आवडतेसामाजिक कार्य ,
अगम्य प्रतिभेचे लेणेलाभलेला मनोज शतप्रतिशत भारतीय आहे मराठीमातीचा त्याला अभिमान आहे,त्याच्या सर्व नृत्यप्रकार अभूतपूर्व यश संपादितकरताहेत , काळाच्या ओघात पुसतहोत चालेल्या लोककलांचेपुनारोत्जीवन करण्याच प्रयत्न मनोजनेटाने करतो आहेमनोजचे स्वप्न आहे कि मला नाचाचे नृत्य बनवायचे आहे आणि नटरंग ला नटराज .
शिव शंकर च्या नटराज स्वरूपाला मैत्रायणाचे सादर सादर अभिवादन
शशांक रांगणेकर
मुंबई ९८२१४५८६०२