बोलती पुस्तके
भारतीय संस्कृती श्रुती आणि श्रुतीची संस्कृती आहे ,श्रुती म्हणजे एकणे आणि स्मृती म्हणजे स्मरणात ठेवणे हा साधा आणि सोपा अर्थ ह्या उपक्रमांनी सफल केला आहे. तुक्याचे अभंग,नामदेवाचे अभंग ,अनेक संत कवींचे साहित्य अमर केले ते सर्वसामान्यांच्या श्रुतीने आणि स्मृतीने ,जनीच्या विठ्ठल प्रेमाचा लडिवाळ अविष्कार आजही जनसामान्यांना अनुभवता येतो तेही ह्याच श्रुती आणि स्मृतीने ,डफावर ची थाप ऐकून अंगातले रक्त सळसळते आणि शिवरायाची आठवण जागते आणि हात नकळत मुजरा करतात ,एकतारीचे स्वर आणि सूर देवघर उभे करते आणि मनासज्जनाचे घोष समर्थ रामदासांचे तेजस्वी स्वरूप जागवते ते ह्याच श्रुती आणि स्मृतीने ,जे कानावर पडते ते मनाचा ठाव घेते आणि अमर्त्य होते कारण मन कधीही मरत नाही ,वारसा हक्काने पुढच्या पिढी कडे ते जाते ,आमच्या आई बाबांनी ,आजी आजोबांनी काका मामांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी ते मन आम्हाला दिले ,पण आम्ही पुढचा पिढीला काय देऊ ?काहीही नाही कारण आमच्याकडे बोलायला वेळ नाही आणि त्यांच्याकडे वाचायला वेळ नाही मग यावर तोडगा काय? ,"हि आनंदाची बोलती पुस्तके "स्वतः बोलणारी आणि तुम्हा आम्हाला सर्वांना विचार करायला लावणारी ,विचार करू नकात वेळ हि डाउनलोड करा ,पण ती करता करता आनंदाला शुभेच्छा धन्यवाद द्यायला विसरू नकात नाहीतर ती कृतघ्नता ठरेल .

आनंद तुला आणि तुझ्या ह्या महान कार्याला अभिष्ट चिंतून हा लेख संपवतो .
शशांक रांगणेकर ९८२१४५८६०२