Translate

गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

शशांक केतकर



आज आकाशात बरेचसे ढग दाटून आले आहेत ,तृषार्त चातका प्रमाणे सर्व जण पावसाची वाट पाहताहेत ,फेस बुक हि आमची खिडकी झाली आहे ,ह्या खिडकी तून बाहेरचे वारे येतात आणि जगात काय चालले आहे आहे ह्याची जाणीव करून देतात. म्हंटला बघूया फेस बुक वरचा पाऊस काय म्हणतोय .सर्फ करता करता एका कलाकाराचे प्रोफाईल नजरेत पडले ,शशांक केतकर ह्याचे आणि नावात साम्य असल्याने ते पूर्णपणे पाहण्याचा मोहही आवरला नाही.

एक अतिशय सुंदर आणि सोप्प्या शब्दात गुंफलेले चारच ओळींची कविता होती,"बोलले मेघ हे सारे अन बोलले थेंब रे ...........
अतिशय तरल शब्दात पावसाच्या चाहुलीची भावपूर्ण कुजबुज सांगणारी हि कविता मनापासून भावली.
प्रोफाईल ची सफर चालूच होती ,आणि तिळा उघड म्हणताच उघडणारी अलिबाबा ची गुहा उघडली.
केवळ चकचकीत चेहरा असलेला हा रंगकर्मी नाही तर सामाजिक संवेदानाचे भान ठेवणारा ,मनात कविता जपणारा आणि फुलवणारा एक संवादशील कलाकार आहे.
चेहऱ्यावर चमकणारे बुद्धिमत्तेचे तेज आणि डोळ्यात ओथंबणारे माणुसकीचे मेघ.आणि प्रसन्ना व्यक्तिमत्वाचे गुलाबी वलय. छोट्या पडद्यावरचे एक मोठे उदयोन्मुख आगमन.
मी सहसा मालिका बघत नाही कारण त्यात दिसणाऱ्या व्यक्ती मला अनोळखी वाटतात ,चांगुलपणा आणि दुष्टपणा ह्याची सीमा गाठणारी व्यक्तिमत्व अजूनतरी परमेश्वर कृपेने माझ्या भेटीला आलेली नाहीत. पण शशांक काम करत असेलेली सिरीयल थोडा वेळका होईना त्याच्या उपस्तिथी मुले सुसह्य वाटते. एक संयत अभिनयाचे दर्शन होते.

शशांक ने अभिमानाने आपण जोपासलेल्या झाडाच्या आंब्याचे फोटो भिंतीवर टाकले आहेत.मातीशी नाते सांगणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सिरीयल च्या कचकडी जगात राहूनही स्वतःच्या श्रमाने मोहरणारे अनोखे रूप.

ज्ञान कोशकार केतकर महाराष्ट्रातले एक धीमंत व्यक्तिमत्व ,शशांक हि त्या बुद्धीचा वारसा ठेऊनच आहे.सेलिब्रेटी आणि त्यांचे समाजकार्य ह्यावरचे त्याचे भाष्य त्याच्या निरक्षण क्षमता आणि अचूक भाष्य हे ह्याची ठळक ओळख देतात.
शशांक एक लोकप्रिय कलाकार आहे ,पण तरीही त्याच्या कला गुणांना पुरेसा वाव मिळत नाही आहे हि खंत मनात कुठेतरी सालात राहते ,कदाचित त्याचे व्यक्तिमत्व पेलवेल अश्या भूमिका सिरीयल निर्मात्यांकडे नसाव्यात का.अभिनय उच्चारण आणि प्रसन्ना व्यक्तिमत्व लाभलेल्या ह्या गुणी कलाकार ह्या छोट्या पडद्याला पेलवत नाही कि उमगत हेच नाही कळत .
नाही.
शशांकाचे पूर्ण प्रोफाईल मी पहिले आनंद वाटला मराठी कलाक्षेत्राला एक सुसंस्कृत बुद्धिमान लोभस आणि तेजस्वी वाक्तीमात्वा नियती भेट म्हणून देते आहे आणि छोट्या पडद्यावरच्या बड्या बुजुर्गांनी ह्या नावागाताच्या दैवी देणगीचा लाभ घेऊन त्याला आणि ह्या छोट्या पडद्यालाही मोठे बनवावे सर्वार्थाने.
मनात डोकावणारा एक अनाहूत विचार "मी ह्या व्यक्तीला ओळखतही नाही तरीही मला ह्याच्या बद्दल चार शब्द लिहावेसे का वाटले उत्तर आले ते दैवी गुण बुद्धीचे रूपाचे आणि माणुसकीचे त्यांना तू पूर्ण ओळखतोस ना ते ह्याचात दिसले आणि त्यंनी घातलेल्या सादेचा हा प्रतिसाद असावा आणि काय.
शशांक शिरीष केतकर ह्या व्यक्तीलाच नव्हे तर व्यक्तिमत्वाला मैत्रायाणाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

बोलती पुस्तके



                                                       बोलती पुस्तके

आनंद वर्तक बोलती पुस्तके ह्या एका अभियानाचे प्रणेते ,आनंदाचे ह्याबद्दल जेवढे करावे तवढे कौतुक थोडेच आहे ,रामदास पाध्यांनी बाहुल्यांना बोलते केले आणि मराठी  कला जगात एक वेगळीच सुरवात झाली ,आवडाबाई आणि  अर्धवट राव मराठी मनाला हसवून गेले ,त्यांची ओळख मराठी मनात अजूनही ताजी आहे आता तर आनंद यांनी पुस्तकांनाच बोलते केले  आहे ,वाचा आणि लिहा ह्याबरोबर ऐका आणि समजा  हा एक वेगळा संदेश दिला आहे, आजच्या तरुणाईला वाचायला नको पण ऐकायला आवडते मग घ्या हे बोलते पुस्तक अगदी डोळे मिटून मिटून एका तुमचे डोळे उघडतील ,ह्यातल्या पुस्तकांची निवड आनंदाचा मराठी साहित्याचा व्यासंग किती दांडगा आहे ह्याची ओळख देते .सर्व प्रकारचे लेखन ह्यात समाविष्ट केले आहे ,अभ्यास अचूक पारख आणि जन मनसावरची  पकड ह्याशिवाय हा प्रयोग सफळ  होणे शक्य नाही ,आनंद चे काम फार मोठे आहे बहु आयामी व्यासंग हे बहुश्रुत ज्ञानार्जानाने साध्य  होते ,.

भारतीय संस्कृती श्रुती आणि श्रुतीची संस्कृती आहे ,श्रुती  म्हणजे एकणे  आणि स्मृती म्हणजे स्मरणात ठेवणे हा साधा आणि सोपा अर्थ ह्या उपक्रमांनी सफल केला आहे. तुक्याचे अभंग,नामदेवाचे अभंग ,अनेक संत कवींचे साहित्य अमर केले ते सर्वसामान्यांच्या श्रुतीने आणि स्मृतीने ,जनीच्या विठ्ठल प्रेमाचा लडिवाळ अविष्कार आजही जनसामान्यांना अनुभवता येतो तेही ह्याच श्रुती आणि स्मृतीने ,डफावर ची थाप ऐकून  अंगातले रक्त सळसळते आणि शिवरायाची आठवण जागते आणि हात   नकळत मुजरा करतात ,एकतारीचे  स्वर आणि सूर देवघर उभे करते आणि मनासज्जनाचे घोष समर्थ रामदासांचे तेजस्वी स्वरूप जागवते ते ह्याच श्रुती आणि स्मृतीने ,जे कानावर पडते ते मनाचा  ठाव घेते आणि अमर्त्य होते कारण मन कधीही मरत नाही ,वारसा हक्काने पुढच्या पिढी कडे ते जाते ,आमच्या आई बाबांनी ,आजी आजोबांनी काका मामांनी शेजाऱ्या  पाजाऱ्यांनी  ते मन आम्हाला दिले ,पण आम्ही पुढचा पिढीला काय देऊ ?काहीही नाही कारण आमच्याकडे बोलायला वेळ नाही आणि त्यांच्याकडे वाचायला वेळ नाही मग  यावर तोडगा काय? ,"हि आनंदाची बोलती पुस्तके "स्वतः बोलणारी आणि तुम्हा आम्हाला सर्वांना विचार करायला लावणारी ,विचार करू नकात  वेळ हि डाउनलोड  करा ,पण ती करता करता आनंदाला शुभेच्छा धन्यवाद द्यायला विसरू नकात नाहीतर ती कृतघ्नता  ठरेल . 
आनंद  तुला आणि तुझ्या ह्या महान कार्याला अभिष्ट  चिंतून  हा लेख संपवतो .

शशांक रांगणेकर ९८२१४५८६०२ 

बुधवार, १ एप्रिल, २०१५

सुनील अग्रेसर



सुनील अग्रेसर

 कदाचित आजच्या पिढीला माहित हि नसेल ,
आमच्या लहानपणी एक घरघुती क्यालीडोस्कोप यायचा,नळीत तीन काचेच्या आरशाच्या त्रिकोणी आकाराच्या पिऱ्यामिड मध्ये काचेच्या रंगी बेरंगी बांगड्यांचे तुकडे घातलेले असत आणि त्यांचे प्रतिबिंब  काचेच्या पडद्यावर दिसत असे ,रंगी बेरंगी ती प्रतिबिंबे आम्हा मुलांना फार आवडत तांस तास ते बघत राहणं हा माझ्या बालपणीच्या सर्व मुलांचा एक लाडका खेळ होता ,त्यात सर्वात मजेची गोष्ट म्हणजे एकदा दिसणारी रंगीत आकृती चित्र परत आकाराला येत नसे ,दर वेळेला एक वेगळीच आकृती दिसे आणि किंमत फार तर आठ आणे अथवा रुपया ,अर्थात त्यावेळी रुपयाही किंमत होती .

आता आयुष्याच्या संध्याकाळी असाच एक कालीदोस्कॉपे बघायला मिळतोय नाव "सुनील अग्रेसर",कलेच्या च्या सर्व क्षेत्रात आपला सुनील ठसा उमटवणारा हा सुनील अग्रेसर खरोखर सर्वार्थाने अग्रेसर आहे ,अभिनय ,  दिग्दर्शन ,निर्मिती ह्या सर्व क्षेत्रात ठसा उमटवणारे बरेच प्रतिथ यश माझ्यापाहण्यात आहेत पण त्या यशाबरोबर सहृदय तेचे परोपकारी गुण विशेष मात्र ह्याच्या कडे आहेत.
नवागतांसाठी सिनेमा क्षेत्राच्या मायानगरीत एक विश्वासू मार्गदर्शकाचे व्रत अचारणारा सुनील हा जेव्हडा मोठा कलाकार त्याही पेक्षा मोठा माणूस आहे ,त्याचे व्रताच माणुसकीचे आहे मायानगरीत  नवागात प्रवेशणाऱ्याचे मनापासून "योग क्षेमं वहाम्यहम"म्हणत आपल्या अनुभवाचे भांडार सर्वांसाठी मुक्त कर णाऱ्या सुनील ला  मैत्रायण चा मानाचा मुजरा


शशांक रांगणेकर मुंबई ९८२१४५८६०२