Translate

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

श्रेयस गोखले

श्रेयस गोखले
"का कशाला?कोणासाठी ?हे  आयुष्य जगायचे असते हा प्रश्न आहे एका चोवीस वर्षीय तरुणाचा ज्या वयात पाय जमिनीला लागत नाहीत त्या वयात का कशासाठी आणी कोणासाठी जगायचे हा प्रश्न ज्याला पडतो तोच जगण्याचे मोल जाणतो आणी त्याला  पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही सोडवतो हा माझा अनुभव आहे, आणी ज्याला हे प्रश्न पडत नाही त्याला उत्तरेही सापडत नाही हाही एक अनुभव
 श्रेयस तरुण आहे ,आणी नुसताच तरुण नाही तर तारुण्य त्याच्या रगारगात सळसळते आहे ,फक्त गल्लीच्या नाक्यावर ,कॉलेज च्या क्यान्तीन मध्ये ओघळणारे हे तारुण्य नव्हे तर मला काहीतरी करायचे आहे "कुछ   करके दिखाना है "म्हणत कोका कोल्याची जाहिरात करणारे हे वांझोटे तारुण्य नव्हे तर आस्मांको  जमिन् से  मिलाना है सांगणारे सर्जनशील तारुण्य आहे ,सर्जनशीलता हि जर तरुणाईला साथ करत नसेल तर ती तरुणाई वांझोटी ठरते आणी फक्त लोक संख्येची  पुज्ये  वाढवते .,पण सर्जनशीलतेचे कोंब फुटणारे काव्य करणारा एखादाच श्रेयस आयुष्याला जीवन म्हणावेसे वाटणारी वाटचाल करतो आणी ती हि चोविशीच्या उण्यापुऱ्या शिदोरीच्या जोरावर काय समजायचे लखलखीत काव्य प्रेरणा कि गत जन्माची क्यारी फॉर वर्ड  होणारी दैवी देणगी .अगम्य आणी  अतर्क्य
श्रेयस नागपूरचा आहे अगदी संत्र्यासारखा रसरशीत आणी रसाळ ,काहीच दिवसापूर्वी उर्जा नावाचा एक हवाबंद पाण्याचा प्रकार बाजारात आला आहे कदाचित श्रेयसचे ब्रांदिंग सुरु झालेले दिसतेय .
श्रेयस चे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे तो लिहितो ,कविता करतो ,चित्रपट कथा लिहितो अभिनय करतो दिग्दर्शन करतो आणी लघु का होईना चित्रपटाची निर्मितीही करतो थोडक्यात सांगायचे झाले तर निर्मितीचे कोणतेही क्षेत्र त्याच्या सुगंधी स्पर्शा  पासुन अस्पर्श राहिलेले नाही . एखादे संध्याकाळी श्रावणी पावसात खुलणाऱ्या इंद्रधनुष्या सारखे व्यक्तिमत्व सगळेच रंग तेवढेच लोभस आणी मोहक
श्रेयस लघु पट निर्मिती करतो आहे ,श्रेयस च्या व्यक्तीमत्वाची सर्व बिरूद मिरवणारी हि निर्मिती आपल्या सगळ्यांच्या पसंतीस पुरेपूर उतरेल ह्या बद्दल शंकाच नाही ।
श्रेयसचे हे द्वैदिप्यमान स्वयम्प्रकाशीत व्यक्तिमत्व पाहतानाच ओठांवर नकळत ओळी येतात "गगनी उगवला सायंतारा "
श्रेयसच्या क्यालीडोस्कोपिक व्यक्तिमत्वाला  मैत्रायाणाच्या असंख्य शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२