Translate

मंगळवार, १० मार्च, २०१५

सलिल कुलकर्णी

                              सलिल कुलकर्णी
सलिल कुलकर्णी ,हे नाव तुम्हाला माहीतच आहे ,"आयुष्यावर बोलू काही "माहित नसलेला सुजाण चोखंदळ रसिक मलातरी माहित नाही ,रविकिरण मंडळाच्या कवींचा काव्यगायनाचा उपक्रम परत एकदा "आयुष्यावर बोलू काही "ह्या आपल्या कार्यक्रमाद्वारे  पुनर्जीवित  करणारा एक संगीत वेडा तरुण . सलील आणि संदीप ह्यांनी मराठी रसिकाच्या सुख दुक्खाच्या रमल खुणांना भावगर्भ शब्दात गुंफले  आणि  संगीतिकेच्यारूपाने रंग मंचावर आणले . सामान्य माणसाच्या  भाषेत बोलत बोलत असामान्यत्व  प्राप्त झालेली  हि जोडगोळी मराठी  जन मानसात  एक  अढळ स्थान मिळवून आहेत .

सलीलला संगीतकार म्हणून मराठी माणूस ओळखतो ,सभ्य भाषेत कसलेही अंग विक्षेप नकरता ,केवळ आपल्या सुरेल गाण्याने  रसिकांच्या मनावर आणि कानावरही लीलया ताबा मिळवणारा  हा तरुण केवळ कवी अथवा गायकच नाही तर हाडाचा विचारवंत आहे .चहाड्या  चुगल्या दुसऱ्याचे   चरीत्र्यहनन  ,समकालीन कलावंताबद्दल वाटणारी असूया ,ह्या दुर्गुणा  पासून दूर राहणारा हा कलाकार जेव्ह्हा त्याच्या " सलील अन्प्ल्गड" ह्या दैनिक लोकसत्ता मधील सदरात लिहितो तेव्हा कळते कि ह्या तरुणाला फक्त सुरेल आणि सुगम गाणेच येते असे नाही तर लिहिणेही येते.

रंगभूमीवरच्या मग ती कुठल्याही पडद्यावरची असो कलाकारांबद्दल प्रवाद उठवले जातात ,चेहर्याचा रंग पुसल्यानंतर आणि पुसला नसतानाही ती आपल्या सारखीच सामान्य माणसे आहेत .फ़क्त त्यांच्यातील  कलागुणांनी त्यांना असामान्यत्व  बहाल केले आहे हे बरचसे लोक विसरतात ,त्यात भर पडते  काही वाचाळ  वीरांची,सर्व कलावंताची असलेली आणि नसलेली लफडी कुलंगडी केवळ आपल्याच साक्षीने घडतात आणि त्या सर्वाचे आपण एकमेव साक्षीदार आहोत असे समजणारे आणि  अफवा पसरवणारे  समूह म्हणजे भिशी ग्रुप ,,कट्ट्यावरची मंडळी ,चटोर तथाकथित पत्रकार ,आणि कितीतरी .... सामाजिक प्रदूषण करणाऱ्या  आसुरी प्रव्वृत्तीवर शब्दांचे आसूड जेव्हा सलिल ओढतो तेव्हा वाटते सलिल :स्वच्छ भारत अभियान "ह्या शासकिय  अभियानाचा  तू अशासकीय आणि प्रभावी पुरस्कर्ता आहेस. ज्या शब्दांचे वळ दिसत नाही त्याची  कळ  जाणवते . काही लोकाच्या बेताल आणि मुर्ख बडबडीला कुठेतरी लगाम बसलाच पाहिजे ,आणि तुझे बोचरया  पण सभ्यपणाच्या लक्षमण रेषेला न ओलांडता    लेख  हे खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन करतात .

सलील तुझ्या  चेहऱ्यावरचे चांदण्यासारखे  स्वच्छ हास्य हि तुझ्या मनातल्या विचारांचे  एक परमेश्वरीय  प्रसाद चिन्ह आहे ,आणि  त्यावरच मराठी रसिक भाळतो ,आणि त्याला वाटते हा कुलकर्ण्यांचा सलिल आमचाही आहे  हि आपुलकी कवच कुंडलासारखी  सांभाळेल .
असाच लिहित जा गात जा त्या लिहिण्यावर त्या गाण्यावर न जाणो कित्त्येक खुलतील  फ़ुलतिल.

शशांक रांगणेकर  
९८२१४५८६०२