Translate

रविवार, १९ जानेवारी, २०२५

राधा कृष्णावरी भाळली

राधा कृष्णावरी भाळली
राधा कृष्णावरी भाळली
राधा आणि अमोल मला भेटलेले एक निरागस मेहूण,मेहूण हा शब्द वापरण्या इतके स्वच्छ आणि प्रसन्न आणि प्रफुल्ल.
मेहूण हा शब्द इतका भावांकित आहे कि त्याचा समानार्थी शब्द पती पत्नी ,अथवा नवरा बायको असा होऊ शकत नाही पूजेच्या दिवशी शंकर आणि पार्वतीचे अथवा लक्ष्मी नारायण स्वरूप समजून सन्मानित करून भोजनाला बोलावल्या गेलेल्या निमंत्रित जोडप्याला मेहूण म्हणतात ,त्या शब्दाची गरिमा आगळी वेगळीच आहे .
अमोल आणि राधा साधारण दोन ते तीन वर्षापूर्वी मला भेटले होते,काही कामानिमित्त्य अमोल राधा बरोबर माझ्या कडे आला होता दोघेही साधारण ४ ते पाच तास माझ्या बरोबर होते ,चिरंजीव राहुल देशपांडे च्या ओळखीने ते मला भेटले. अमोल आणि राधा प्रसन्नतेचा एक ठसा माझ्यावर उमटवून गेले ,उच्च पदस्त अमोल म्हणजे एक संस्कारित बियाणे ,ज्याच्या रोमारोमात संस्कार निथळत असतात ,राधाही तशीच ,made for इच other म्हणावे असे,सुशिक्षित संस्कार क्षम सह जीवनाचे एक चालते बोलते रूपक.
प्रेम आपुलकी आदर जिव्हाळा मराठी तल्या ह्या सर्व संस्कारक्षम शब्दांचे प्रगटीकरण करणारे ह्यांचे वर्तन मी अजूनही विसरू शकत नाही.
श्रावण महिन्यात सणावारी मेहूण बरयाच घरात पूजतात त्या आठवणीना उजाळा देणारे हे मेहूण माझ्या कायम आठवणी च्या मखरात बसलेले आहे.
शशांक रांगणेकर
Wednesday, August 8, 2012
१२. १.१४

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

मैत्रायण

"मैत्रायण" 
प्रिय जनहो आयुष्यात चांगली माणसे भेटणे हा दैव(देव)योगच म्हणायचा,त्या देव योगाने आयुष्य संपन्न होत आलाय,"अंनंत हस्ते कमलाकराने ,देता किती घेशील दो कराने"हे नक्षत्रंचे देणे सांभाळून तरी कसे ठेवायचे आणि कुठे ,अमृतात पैजा जिंके अश्या माय बोलीचाच आसरा ,,मला भेटलेल्या ह्या सर्वसामान्य वाटणाऱ्या पण असमान्यात्वाची अदृश्य कवच कुंडले धारण करणाऱ्या ह्या मित्रांची मी रेखाटलेली वेडी वाकडी काहोईना चित्रे तुमच्या पुढे सादर करण्याची मनोमन इच्छा ,साधन "मैत्रायण ""अपुरी शब्दसंपत्ती आणि अपुऱ्या प्रतिभेचा वारसा घेऊन येणाऱ्या ह्या संकल्पनेला फक्त तुमच्याच प्रेमाचा बुडत्याला काडी सारखा वाटणारा आधार ,तुमचा वाचनीय पाठींबा सदैव असो द्यावा .जिथे पु.ल.सारखी दैवत जन्माला येतात तिथल्या मातीलाही फुलांचा वास येतो हेच खरे,मग ते कोर्हन्तीचा का असेना ,मी अभिमानाने सांगतो कि मी पार्ल्याचा आहे ज्या पार्ल्याचे नाव पु ल.नि अजरामर केले ,माणसांनी माणसाचे देव गुण वर्णावे हा त्यांनी दिलेला वारसा ,त्याची जपणूक करण्याची केलेली एक केविलवाणी का होईना धडपड ,
,"मैत्रायण"
 शशांक रांगणेकर
मुंबई 
९८२१४५८६०२